- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच अवघ्या तीन दिवसांच्या अंतराने आता चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील एका शेतकऱ्याने आज,रविवार ११ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास गाव नजीकच्या शेत तलावात उडी घेत जीवन संपवले. मुखरू लक्ष्मण दडमल वय ६५ वर्षे,रा.मिंथूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पावसाअभावी धान पिकाचे नुकसान,तसेच घेतलेल्या कर्जाच्या चिंतेने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी मुखरू दडमल यांच्याकडे दीड एकर धानाची शेती आहे.पावसाअभावी शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यातच,मायक्रोफायनान्सच्या कर्जाची चिंता त्यांना भेडसावत असल्याने तलावात उडी घेत जीवन संपवले. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी तलाव परिसरात मोठी गर्दी केली.दरम्यान,नागभीड पोलीस ठाण्याचे ठाणेदार कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.शेतकऱ्याचा शोध घेण्याचे सुरू असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

