Sunday, October 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात; श्रद्धेसोबत जीवाची काळजी घेणे आवश्यक..

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात; श्रद्धेसोबत जीवाची काळजी घेणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,रविवार ११ ऑक्टोंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.नवरात्रीच्या दिवसांत अनेक भाविक उपवास करतात.धार्मिक श्रद्धेपोटी पायात चप्पल न घालता अनवाणी चालण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते.देवीच्या दर्शनासाठी किंवा नवसपूर्तीसाठी मैलोनमैल अनवाणी चालणारे भाविकही आहेत.मात्र,चालू महिन्यातील वाढता उकाडा,त्यातच उपवास आणि अनवाणी चालणे यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.पुरेसे पाणी न घेतल्यास डिहायड्रेशनचा धोका,तर उन्हाने तापलेल्या रस्त्यावर अनवाणी चालल्यास पाय भाजणे,फोड येणे किंवा जखम होण्याची शक्यता वाढते.त्यामुळे नवरात्रीत श्रद्धेसोबतच जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे,उष्णतेमुळे शरीरातील पाणी आणि क्षार मोठ्या प्रमाणात घामावाटे कमी होतात.त्यात उपवासामुळे आहाराचे प्रमाण कमी झाल्यास शरीराला ऊर्जा व पोषण मिळत नाही.दिवसभर केवळ चहा-कॉफीवर किंवा अत्यल्प पाण्यावर राहणे टाळावे.तहान लागण्याची वाट न पाहता ठराविक अंतराने पाणी प्यावे. ताक,नारळपाणी,दूध,दही यांसारख्या द्रवपदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करावा.तज्ञ डॉक्टरांच्या मते,उपवास म्हणजे पूर्णपणे उपाशी राहणे नव्हे.शरीराला आवश्यक पाणी,ऊर्जा आणि पोषक घटक मिळणे गरजेचे आहे. ऑक्टोंबरच्या उकाड्यात उपवासासोबत लांब अंतर अनवाणी चालल्यास डिहायड्रेशन,अशक्तपणा आणि पायाच्या दुखापतीचा धोका वाढू शकतो.विशेषतः मधुमेही आणि ज्येष्ठांनी अधिक काळजी घ्यावी. चक्कर,अशक्तपणा,जास्त घाम येणे,धडधड किंवा अस्वस्थ वाटल्यास उपवास आणि चालणे थांबवून वैद्यकीय सल्ला घ्यावा.मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये पायांच्या संवेदना कमी होण्याची शक्यता असते.त्यामुळे पायाला उष्णतेची झळ बसली किंवा दुखापत झाली तरी ती जाणवेलच असे नाही.छोटी जखमही दुर्लक्षित राहिल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.त्यामुळे मधुमेहींनी शक्यतो अनवाणी चालणे टाळावे आणि दररोज पायांची तपासणी करावी.चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे,जास्त तहान लागणे,तोंड कोरडे पडणे, लघवीचे प्रमाण कमी होणे,डोकेदुखी,अशक्तपणा, उलट्या,धडधड किंवा बेशुद्ध पडण्यासारखी लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करू नये.अशा वेळी उपवास थांबवून द्रवपदार्थ घ्यावेत आणि गरज असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.ज्येष्ठ नागरिक,गर्भवती महिला, स्तनदा माता,मधुमेही तसेच रक्तदाब,मूत्रपिंड किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी उपवास आणि अनवाणी चालण्याबाबत विशेष काळजी घ्यावी.श्रद्धा जपत असतांना शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नये,असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आणखी एका शेतकऱ्याने तलावात उडी घेत संपवले जीवन..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी...

अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू; देसाईगंज शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ११ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गोंदिया मार्गे...

बदमाश जावयाने सासऱ्याच्या छातीमध्ये भोसकला चाकू; छातीमध्ये रूतलेल्या चाकूसह गाठले रुग्णालय..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका ३५ वर्षीय पुतणजावयाने सासऱ्यावर जीवघेणा चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना...

चेक बाऊन्स प्रकरणी कर्जदाराला सहा महिन्याचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-कित्येकदा अनेकजण राष्ट्रीयकृत बँका वा इतर पतसंस्थांकडून कर्ज उचलून त्यांची परतफेड करण्याचे टाळत असतात.त्यातच,काहीजण बँकेच्या खात्यात रक्कम नसतांनाही चेक देऊन परतफेडीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!