Saturday, October 10, 2026
Homeचंद्रपूरक्षुल्लकशा कारणावरून शालेय विद्यार्थ्याने घेतला गळफास..!

क्षुल्लकशा कारणावरून शालेय विद्यार्थ्याने घेतला गळफास..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-क्षुल्लकशा कारणावरून एका ११ वर्षीय
शालेय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरालगत असलेल्या बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथील एका खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेतून समोर आली आहे.जीवन विलास झरेकर वय ११ वर्षे, रा.खांबाडा,ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता पाचवीत होता.विशेष म्हणजे,मृतक जीवनचे सैनिकी शाळेतील हे पहिलेच वर्ष होते.
जीवनला त्वचा विकाराचा(खाज)त्रास सुरू झाल्याने गुरुवार ८ ऑक्टोंबर २०२६ रोजी शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना तातडीने बोलावून घेतले आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत तीन ते चार दिवस त्याला गावी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता.मात्र,वडिलांनी मुलाला बाहेर डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केले आणि अवघ्या दोन तासांतच त्याला पुन्हा सैनिकी शाळेत सोडले.गावी जाता येत नसल्याचे आणि पुन्हा त्याच वातावरणात राहावे लागत असल्याचे समजताच जीवन निराश झाला व रडू लागला.घटनेच्या दिवशी सर्व मुले बाहेर मैदानात होती,तो सात ते आठ मिनिटे रडतच राहिला व त्याने वसतिगृहातील कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.महत्वाचे म्हणजे,सुरुवातीला पालकांकडून शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप केले जात होते.मात्र,सदरची घटना ही शाळेतील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाल्याने रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व शाळा प्रशासनाने हे सर्व फुटेज मृत जीवनच्या पालकांना प्रत्यक्ष दाखवले.त्यात तो रडत असून त्यानेच आत्महत्या केल्याचे त्या फुटेजमधून स्पष्ट झाल्याने आरोपाचे खंडन झाले.एका क्षुल्लकशा कारणाने मुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने झरेकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!