Saturday, October 10, 2026
Homeगडचिरोलीतब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे हिवतापावर(मलेरिया)नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे.जिल्हा हिवताप अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार,मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हिवताप चाचणी पॉझिटिव्हिटी दर, वार्षिक परजीवी निर्देशांक(API)आणि हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.
  • हिवताप चाचणी पॉझिटिव्हिटी दरात मोठी घसरण👇
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार,जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिवतापाचा चाचणी पॉझिटिव्हिटी दर ०.४९ टक्के इतका नोंदविला गेला होता.यंदा जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल १२ लाख १९ हजार ७८३ विक्रमी चाचण्या करण्यात आल्या,यामध्ये मागच्या वर्षीच्या सप्टेंबर पर्यंतच्या ६ हजार ४११ बाधितांच्या संख्येच्या तुलनेत ह्या वर्षी ३ हजार ९४० पर्यंत खाली आली असून पॉझिटिव्हिटी दर ०.४९ वरून घसरून ०.३२ टक्क्यांवर आला आहे.विशेष म्हणजे,सप्टेंबर २०२६ मध्ये हा पॉझिटिव्हिटी दर अवघा ०.२० टक्क्यांवर मर्यादित राहिला आहे.
  • वार्षिक परजीवी निर्देशांकात(API) लक्षणीय सुधारणा👇
जिल्ह्यात सातत्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे वार्षिक परजीवी निर्देशांकात(API)सातत्यपूर्ण घट दिसून येत आहे. वर्ष २०२१ मध्ये जिल्ह्याचा एपीआय १०.९७,वर्ष २०२२ मध्ये ८.१७,वर्ष २०२४ मध्ये ५.९०,तर वर्ष २०२५ मध्ये ६.४२ इतका नोंदवला गेला होता.चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रभावी कीटक नियंत्रण आणि गतिमान रुग्ण शोध मोहिमेमुळे जिल्ह्याचा सरासरी एपीआय ४.६२ पर्यंत खाली आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
  • हिवताप मृत्यूंमध्ये मोठी घट; सलग दोन महिने शून्य मृत्यू👇
आरोग्य यंत्रणेमार्फत वेळेवर अचूक निदान आणि तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून दिल्याने हिवताप मृत्यू रोखण्यात मोठे यश मिळाले आहे.सन २०२४ व २०२५ मध्ये प्रत्येकी १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता,तर २०२६ मध्ये ही संख्या  घटून ६ वर आली आहे.अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे,ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ या सलग दोन महिन्यांत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
  •  १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या👇
हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम अधिक गतिमान केली आहे.जानेवारी ते सप्टेंबर २०२६ दरम्यान ५ लाख ७ हजार ६७५ रक्त नमुन्यांची सूक्ष्मदर्शक तपासणी(Blood Smears) आणि ७ लाख १२ हजार १०८ आरडीके(RDK)अशा एकूण १२ लाख १९ हजार ७८३ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या.दुर्गम व संवेदनशील भागांत ताप रुग्ण आढळताच जागेवरच जलद चाचणी करून तात्काळ योग्य औषधोपचार सुरू केले जात आहेत.
  • अतिजोखामीच्या गावातील कीटकनाशक फवारणीची (IRS)पहिली फेरी यशस्वी; ९८.९ टक्के लोकसंख्या संरक्षित👇
डासांच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी १० जून ते ०४ सप्टेंबर २०२६ दरम्यान पहिल्या फेरीत घरातील कीटकनाशक फवारणी(IRS)मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.यामध्ये निवडलेल्या सर्व १ हजार १९५ गावांमध्ये १ लाख ६० हजार ९५६ घरांमध्ये फवारणी पूर्ण करण्यात आली.यामुळे ५ लाख ९ हजार ५८ नागरिकांना सुरक्षित संरक्षण कवच पुरविण्यात आले आहे.फोकल राऊंड मध्ये नव्याने वापरण्यात आलेल्या अल्फा सायपरमेथ्रीन कीटकनाशकाच्या जैविक चाचणीत फवारणीनंतर २४ तासांत डास नष्ट झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
  • घरोघरी सर्वेक्षण,आश्रमशाळा तपासणी आणि जनजागृती उपक्रम👇
दुर्गम व अतिसंवेदनशील भागांत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन ताप रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे.याशिवाय जिल्ह्यातील १५० आश्रमशाळांमधील ३९ हजार ६६३ विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी करून बाधित आढळलेल्या ३७१ विद्यार्थ्यांना त्वरित उपचार करण्यात आले. रोजगारासाठी बाहेरगावी गेलेल्या व परत आलेल्या १४ हजार ८९१ स्थलांतरित नागरिकांचे १०० टक्के स्क्रीनिंग करण्यात आले आहे.तसेच आठवडी बाजार डे, गावागावांत दवंडी/माईकिंग,आरोग्य मेळावे आणि शाळांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क केले जात आहे.
  • पुजारी व वैदूंना जिल्हा परिषद सेस मधून प्रोत्साहन मानधन👇
दुर्गम भागातील तापाचा रुग्ण वेळेत शासकीय तपासणीसाठी पाठवल्यास स्थानिक पुजारी व वैदूंना प्रति रुग्ण १५ रुपये आणि तपासणीत हिवताप आढळल्यास २०० रुपये प्रोत्साहन मानधन दिले जात आहे.या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १५ हजार २५० रुपये १०१ पूजऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
  • कीटकनाशक प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्यांचे वाटप👇
डासांच्या चावण्यापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील आश्रमशाळा,वसतिगृहे आणि अतिसंवेदनशील गावांमधील नागरिकांना १ लाख १६ हजार ३७२ कीटकनाशक प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.
  • उपचार पूर्ण करणाऱ्या रुग्णांना बुडित मजुरी👇
हिवतापबाधित रुग्णांनी उपचाराचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा यासाठी आरोग्य विभागाकडून आर्थिक साहाय्य दिले जात आहे.उपचार पूर्ण करणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ५०० रुपये बुडित मजुरी थेट बँक खात्यात दिली जात असून,आतापर्यंत ५६६ रुग्णांना एकूण २ लाख ८३ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
  • खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना आवाहन👇
जिल्ह्यातील स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना सुद्धा हिवताप तपासणी किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यांनी प्रत्येक ताप रुग्णांची हिवताप तपासणी करावी किंवा त्यांना शासकीय संस्थेत संदर्भित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  • नागरिकांना आवाहन👇
नागरिकांनी डासांची पैदास रोखण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नये,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा,तसेच मच्छरदाणीचा रात्री झोपतांना  न चुकता नियमित वापर करावा.थंडी वाजून ताप, डोकेदुखी अथवा अंगदुखी जाणवल्यास घरगुती किंवा पारंपरिक उपाय न करता तात्काळ जवळच्या आशा स्वयंसेविका,उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची मोफत तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घ्यावेत.
  • प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हिवतापावर नियंत्रण शक्य-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि दुर्गम जिल्ह्यात हिवतापाचा संसर्ग आणि मृत्यू नियंत्रणात आणणे हे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनाचे फलित आहे.विक्रमी चाचण्या, अतिजोखमीच्या भागांत कीटकनाशक फवारणी आणि पुजारी-वैदूंना सोबत घेऊन राबवलेली मोहीम गेमचेंजर ठरली आहे.सलग दोन महिने शून्य मृत्यू ही दिलासादायक बाब असली,तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने थंडी-ताप जाणवल्यास तात्काळ शासकीय केंद्रात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी.हिवतापमुक्त गडचिरोली घडवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे.

  • आरोग्य कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची फलश्रुती-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे
आशा स्वयंसेविका,आरोग्य सेवक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अगदी दुर्गम पाड्यांपर्यंत पोहोचून केलेल्या अविरत परिश्रमांमुळेच पॉझिटिव्हिटी दर आणि एपीआय(API)मध्ये ही लक्षणीय घट साध्य झाली आहे. रुग्णांना औषधोपचार पूर्ण करण्यासाठी दिली जाणारी ५०० रुपयांची बुडित मजुरी, आश्रमशाळांमधील विशेष तपासणी आणि औषधबाधित मच्छरदाण्यांचे वाटप यांसारख्या योजना तळागाळात प्रभावीपणे पोहोचल्या आहेत.खाजगी डॉक्टरांनीही प्रत्येक ताप रुग्णाची मलेरिया चाचणी करावी किंवा त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवावे.नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साचू न देता आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!