- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर कार रस्त्यावर पलटी झाल्याची घटना बुधवार १४ ऑक्टोंबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड मार्गावरील तळोधी येथील गोविंदपूर बायपासवर घडली. हरिदास दशरथ चंदनखेडे वय ६१ वर्षे,रा.तळोधी असे अपघातात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.तर या प्रकरणी तळोधी पोलिसांनी कारचालक तुषार संजय मैंद वय ३२ वर्षे, रा.मधुबन कॉलनी,देसाईगंज (वडसा), जि.गडचिरोली याला अटक करून गुन्हा क्रमांक २६४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१),२८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतकरी हरिदास चंदनखेडे हे रात्रीच्या सुमारास शेतीला पाणी देण्यासाठी शेतावर गेले होते.त्यानंतर,ते रात्रीच सायकलने घरी परतत होते.दरम्यान,एमएच ३३ व्ही १७९७ क्रमांकाची स्विफ्ट कार देसाईगंजकडे निघालेली असतांना गोविंदपूर बायपास मार्गावर पोहचताच हरिदास चंदनखेडे यांच्या सायकलला जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की अपघातात गंभीर जखमी झालेल्या चंदनखेडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच तळोधी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून चंदनखेडे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
- Advertisement -

