Thursday, October 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत.एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्रत्येकी रु.२,०००/-प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजूरी देण्यात आली असून यासाठी तब्बल ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अश्यातच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना,महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना,महाराष्ट्र राज्य,नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी,असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे,राज्यात १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २ लाख १४ हजार ९७ पदे कार्यरत आहेत.सदरची दोन हजाराची रक्कम ही दिवाळीपूर्वीच अदा करण्यात येणार असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसांची दिवाळी गोड होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!