Monday, October 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तधावत्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग; दोघांचा ट्रकमध्येच होरपळून मृत्यू..

धावत्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग; दोघांचा ट्रकमध्येच होरपळून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-फुलकोबी घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागून क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.आग इतकी वेगाने पसरली की ट्रकमध्ये बसलेल्या दोन जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसल्याने ट्रकमधील दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.मृत पावलेल्या दोघांची अद्याप नावे समोर आलेली नसून घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. सदरचा अपघात हा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर १२७ वर घडला.ट्रक समृद्धी महामार्गावरून जात असतांनाच अचानक ट्रकचा टायर मोठ्या आवाजासह धाडकन फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला अचानक मोठ्या प्रमाणावर आग लागली.क्षणात आग इतकी वेगाने पसरली की ट्रकमध्ये बसलेल्या दोन जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला.दरम्यान,दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावर काहीकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून घटनेची चौकशी सुरू केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात आजपासून बेमुदत उपोषण.. -सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांचेसह प्रा. मुनिश्वर बोरकर व कार्यकर्ते बसले होते बेमुदत उपोषणाला..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून जागा अकृषक केली व बेकायदेशीर प्लॉट पाडून विक्रीचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून...

गडचिरोलीच्या जलसंधारण व कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे नवी दिल्लीत सादरीकरण.. -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडली जिल्ह्याची कामगिरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील जलसंधारण, दुष्काळ प्रतिकारक्षमता आणि कृषी मूल्यवर्धनाच्या उपक्रमांचे सादरीकरण...

मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देसाईगंज येथे महाविकास आघाडीचे निदर्शने आंदोलन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी,याकरिता आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी...

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!