Monday, October 12, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीच्या जलसंधारण व कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे नवी दिल्लीत सादरीकरण.. -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा...

गडचिरोलीच्या जलसंधारण व कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे नवी दिल्लीत सादरीकरण.. -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडली जिल्ह्याची कामगिरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील जलसंधारण, दुष्काळ प्रतिकारक्षमता आणि कृषी मूल्यवर्धनाच्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध योजनांच्या समन्वयातून जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या जलसंधारण सुविधा आणि शेतमाल प्रक्रिया उपक्रमांची माहिती दिली.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलाच्या भारतरत्न सी.सुब्रमण्यम सभागृहात आज,सोमवार १२ ऑक्टोंबरला कार्यक्रम संपन्न झाला.जिल्हास्तरीय उपक्रमांच्या सादरीकरणासाठी गडचिरोलीसह आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू आणि बिहारमधील बांका या तीन जिल्ह्यांचा समावेश होता.
परिषदेला केंद्रीय कृषी,शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान,केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर आणि भागीरथ चौधरी हेही व्यासपीठावर उपस्थित होते.याशिवाय केंद्रीय कृषी विभागाचे सचिव अतीश चंद्रा,अतिरिक्त सचिव मनमीत नंदा तसेच ‘डेअर’चे सचिव तथा भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ.हिमांशू पाठक यांच्यासह संबंधित ११ मंत्रालयांचे वरिष्ठ सनदी अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सादरीकरणात दिलेल्या माहितीनुसार,गेल्या दोन वर्षांत विविध योजनांचा समन्वय साधून गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार १५ जलसंधारण कामे पूर्ण करण्यात आली असून,६९२ कामे प्रगतिपथावर आहेत.पूर्ण झालेल्या कामांतून सुमारे १८ हजार ७५० दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली आहे.प्रगतिपथावरील कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी सुमारे २ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेची भर पडणे अपेक्षित आहे.
या कामांमध्ये जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत पूर्ण झालेल्या ४ हजार ६३८ कामांचा समावेश असून, अभियानातील ४९६ कामे सुरू आहेत.पारंपरिक जलस्रोत आणि माजी मालगुजारी तलावांमधून सुमारे १७ लाख ४२ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.या गाळ उपशामुळे जलस्रोतांची पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यास मदत झाली आहे.तसेच २५ गावांमध्ये पुनर्भरण विहिरी आणि भूजल पुनर्भरणासाठीच्या रचना उभारण्यात आल्याची माहिती सादरीकरणात देण्यात आली.
पावसातील अनियमितता आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पूर्वतयारीवर आधारित जलव्यवस्थापनाला जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आले आहे.बोडी खोलीकरण,शेततळी, वनराई व गॅबियन बंधारे यांसारख्या उपायांसह दुर्गम आणि डोंगराळ गावांमध्ये सौरऊर्जेवर आधारित उपसा सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून रब्बी हंगामातील सिंचनाला आधार देणे आणि आदिवासी व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीला स्थैर्य देणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
जलसंधारणासोबतच शेतमालाची प्रक्रिया,साठवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी या घटकांवरही सादरीकरणात भर देण्यात आला.जिल्ह्यातील कृषी मूल्यवर्धन उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना देशातील शंभर निवडक आकांक्षित कृषी जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून,त्यात गडचिरोलीचा समावेश आहे.११ मंत्रालये व विभागांच्या ३६ केंद्रीय योजनांचा समन्वय साधून कृषी उत्पादकता वाढविणे,पीक विविधीकरण व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे,सिंचन आणि काढणीपश्चात साठवणूक सुविधा सुधारणे तसेच कृषी पतपुरवठा सुलभ करणे ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.या राष्ट्रीय कार्यक्रमातून गडचिरोलीतील जलसंधारण, दुष्काळासाठीची पूर्वतयारी आणि कृषी मूल्यवर्धनाचे अनुभव देशातील सहभागी जिल्ह्यांसमोर मांडण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात आजपासून बेमुदत उपोषण.. -सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांचेसह प्रा. मुनिश्वर बोरकर व कार्यकर्ते बसले होते बेमुदत उपोषणाला..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून जागा अकृषक केली व बेकायदेशीर प्लॉट पाडून विक्रीचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून...

मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देसाईगंज येथे महाविकास आघाडीचे निदर्शने आंदोलन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी,याकरिता आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी...

धावत्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग; दोघांचा ट्रकमध्येच होरपळून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-फुलकोबी घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागून क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.आग इतकी वेगाने पसरली की...

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!