Monday, October 12, 2026
Homeआरमोरीआरमोरी तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात आजपासून बेमुदत उपोषण.. -सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे...

आरमोरी तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात आजपासून बेमुदत उपोषण.. -सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांचेसह प्रा. मुनिश्वर बोरकर व कार्यकर्ते बसले होते बेमुदत उपोषणाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून जागा अकृषक केली व बेकायदेशीर प्लॉट पाडून विक्रीचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.जुन्या तलाठी कार्यालयाच्या पाडकामाची चौकशी तसेच नगर परिषद क्षेत्रातील कथित अनियमिततेच्या चौकशीसह विविध मागण्यांसाठी आज,सोमवार १२ ऑक्टोंबरपासून मागण्या पूर्ण होईपर्यंत ते न्याय मिळेपर्यंत सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांच्या वतीने चेतन निमगडे व आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचेसह इतर कार्यकर्त्यांनी आरमोरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.आज उपोषणाचा पहिला दिवस होता. उपोषणाच्या हत्यारातून सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांनी शहरात सुरू असलेल्या विविध बेकायदेशीर बाबींवर आवाज उठवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
  • प्रमुख मागण्या👇
१) सर्व्हे नं.१२४२ महाराष्ट्र कुराण सरकारी जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून अकृषक करून विकायला काढल्याने व बेकायदेशीर प्लॉट पाडून विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या व अतिक्रमण करणाऱ्यांवर
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ११६६ च्या कलम ५०,५३ व २४७ अन्वये संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.
२)सर्व्हे नं.१२४२ या महाराष्ट्र कुराण सरकारी जमिनीची महसूल व भूमी अभिलेख विभागाने तात्काळ शासकीय मोजणी करून सीमांकन निक्षित करण्यात यावे.
३)सर्व्हे नं.१२४२ वर अतिक्रमण करून १२४३ मध्ये मागील १५-२० वर्षापासून रहिवासी असलेले घरे शासकीय जमिनीत दाखवून प्रस्ताव पाठविणाऱ्या
दोषी भुमी अभिलेख अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी.
४)सदर शासकीय जमीन तात्काळ शासनाच्या पूर्ण ताब्यात घेऊन तीचे संरक्षण करण्यात यावे.
  • तलाठी कार्यालयाच्या नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर पाडकाम बदल कार्यवाही👇
१) महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ अन्वये नगर परिषदेतील बेकायदेशीर ठराव व कारवाईस तात्काळ स्थगिती देऊन कलम २११ अन्वये या संपूर्ण प्रकरणची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी.
२) शासकीय मालमतेचे नियमबाह्य पाडकाम
करून नुकसान केल्याप्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी,नगरसेवक व कर्मचाऱ्यांवर सार्वजनिक
मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा व विलांबस
प्रतिबंध अधिनियम २००५ च्या कलम १०(२)अन्वये शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी.
३) बेकायदेशीरपणे मिळवण्यात आलेला दिनांक १५/४/२०२६ चा सार्वजनिक बांधकामचा प्रक्षागत तांत्रिक अभिप्राय रद्द करण्यात यावा.
४) BNS कलम ३४० (२)IPC ४७१, BNS कलम ३३६ (३) / IPC ४६५, BNS कलम ३२८ (४) / IPC ४२० अंतर्गत फसवणूक व दिशाभूल माहिती दिल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे.न.प.आरमोरी प्रभाग क.१ सुंदरवन कॉलनी येथील नाली बांधकाम मंजूर नकाशानुसार करणे व श्री गोगले न.प.अभियंता यांना चुकीचे नाली बांधकाम केल्यामुळे निलंबित करण्यात यावे.इत्यादी प्रमुख मागण्या या बेमुदत आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.संबंधित प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी आणि कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी,अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
उपोषणाला सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे,चेतन निमगडे,रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे, टि.एम.खोब्रागडे जिल्हा कार्यवाह,अशोक शामकुळे उपाध्यक्ष,लवकुश भैसारे,मारोती भैसारे,युवा नेते चोखोबा ढवळे,नाजुक भैसारे,नामदेव मेश्राम,भाऊराव रामटेके,जिवन मेश्राम,रोशन उके,हिवराज धंदरे आदींची उपस्थिती होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीच्या जलसंधारण व कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे नवी दिल्लीत सादरीकरण.. -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडली जिल्ह्याची कामगिरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील जलसंधारण, दुष्काळ प्रतिकारक्षमता आणि कृषी मूल्यवर्धनाच्या उपक्रमांचे सादरीकरण...

मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देसाईगंज येथे महाविकास आघाडीचे निदर्शने आंदोलन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी,याकरिता आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी...

धावत्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग; दोघांचा ट्रकमध्येच होरपळून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-फुलकोबी घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागून क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.आग इतकी वेगाने पसरली की...

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!