Wednesday, June 3, 2026
Homeआरमोरीमोठी बातमी.. आरमोरी शहरातील होंडा शोरुमच्या इमारतीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू तर...

मोठी बातमी.. आरमोरी शहरातील होंडा शोरुमच्या इमारतीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी.. – मृतांमध्ये देसाईगंज शहरातील दोघे तर एकजण ब्रम्हपुरी तालुक्यातील..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या  आरमोरी शहरातील मुख्य मार्गावरील पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या प्रसिद्ध लालानी मोटर्स होंडा शोरुमच्या इमारतीची भिंत कोसळून मलब्याच्या ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी
घटना आज,शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली.घटनेत अफसान शेख वय ३२ वर्षे व तहसीन इस्राईन शेख वय ३० वर्षे,दोघेही रा.देसाईगंज,जि.गडचिरोली येथील रहिवासी असून आकाश ज्ञानेश्वर बुराडे वय २५ वर्षे रा.निलज,ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर अशी तिन्ही मृतांची नावे आहेत.तर गंभीर जखमींमध्ये दिपक मेश्राम वय २३ वर्षे व विलास मने वय ५० वर्षे,दोघेही आरमोरी येथील रहिवासी असून सौरभ चौधरी वय २५ वर्षे रा.मेंडकी,ता.ब्रम्हपुरी,
जि.चंद्रपूर अशी गंभीर जखमींची नावे असून तिघांचीही हाडे तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. तिन्ही जखमींवर आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आरमोरी शहरातील लालानी मोटर्स होंडा शोरुम जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.सदर शोरुममध्ये परिसरातील  तसेच इतर ठिकाणाहून नागरिक दुचाकी वाहन खरेदी करण्याकरीता जात असतात.अश्यातच आज,शुक्रवार सायंकाळच्या सुमारास शोरुमध्ये काही नागरिक असतांनाच अचानकपणे क्षणात शोरुमच्या इमारतीची भिंत कोसळली.आतमध्ये असलेले सहा नागरिक इमारतीच्या मलब्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले.भिंत कोसळतच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मलब्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता,तर तिघेजण गंभीर जखमी असल्याने त्यांना आरमोरी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ दाखल केले.त्यानंतर तिघांनाही गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!