Friday, September 25, 2026
Homeआरमोरीपिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची 'ही' अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष द्यायला हवं कारण तिथे पण माणसं राहतात.. -सुजाण नागरिकाने केलेला प्रश्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी टू व्हीलर वाला जर खड्डे चुकवतानी याच्यामध्ये पडला तर गंभीर दुखापत झाल्याशिवाय राहणार नाही.समजा, इमर्जन्सी केस असली तर या मार्गावरून ॲम्बुलन्स जाण्यासाठी किती वेळ लागू शकतो,याची कल्पना तरी कोणी केली काय?शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे.पण गाव खेड्याकडे पण लक्ष द्यायला हवं कारण तिथे पण माणसं राहतात,असे आम्ही नाही तर गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील पिसेवळधा ते भाकरोंडी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या तसेच खडतर प्रवास करणाऱ्या एका सुजाण नागरिकाने आज शुक्रवारच्या सकाळीच प्रशासनाला केलेला प्रश्न आहे.
खरोखरच हल्ली पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.बऱ्याच ठिकाणी भले मोठे खड्डे पडून खड्ड्यांनी पूर्णपणे रस्ताच गिळंकृत केला आहे.दिवस असो वा रात्र वाहनधारकांना खड्डा चुकवतांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. जराही पाऊस पडला तरी रस्त्याची पूर्णपणे वाट लागलेली असते.समजा,सायंकाळच्या सुमारास एखादा अनोळखी व्यक्ती या मार्गाने प्रवास करू लागला,तर त्याला दुचाकी पायी ढकलत नेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.एकीकडे विकासाच्या मोठ्या बाता झोडल्या जाताहेत,तर दुसरीकडे काही ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था आजही पूर्वीसारखीच जैसे थे पाहायला मिळत आहे.यांस जबाबदार कोण? सर्वसामान्य जनता की डोळ्यावर पट्टी बांधून विकासाच्या बाता झोडणारे प्रशासन,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.प्रत्येक वेळी केवळ नागरिकांनीच कार्यालयात जाऊन सांगितले पाहिजे काय?की कार्यालयातील खुर्च्या तोडणाऱ्यांनीही फेरफटका मारून कोणत्या ठिकाणची काय अवस्था आहे; हे ध्यानी-मनी घेतले पाहिजे.पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची पुरती वाट लागलेली असल्याने एखादा अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने प्रशासनाने तातडीने सदर मार्गाची दुरुस्ती करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘पीएम-जनमन’ अंतर्गत तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार.. – योजनेअंतर्गत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुलशी दस्सा पिडसे यांच्या पक्क्या घराचे स्वप्न ‘पीएम-जनमन’ अंतर्गत मंजूर घरकुलामुळे साकार झाले आहे.प्रतिकूल कौटुंबिक...

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!