Wednesday, October 14, 2026
Homeआरमोरीवसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. - आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. विशेषतः नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था अद्याप पूर्णपणे करण्यात आलेली नसल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पाहणीदरम्यान वसतिगृह अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचे,परिसर व खोल्यांची स्वच्छता झालेली नसल्याचे,विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली भोजनावळ सुरू नसल्याचे तसेच इतर अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता आमदार मसराम यांनी व्यक्त केली.परिणामी, या गंभीर प्रकाराची मसराम यांनी तात्काळ दखल घेत प्रकल्प अधिकारी(पीओ) यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत वसतिगृहातील सर्व त्रुटी तातडीने दूर करून साफसफाई,भोजन व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या राहण्याची सुविधा तसेच इतर आवश्यक सोयी त्वरित उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी आमदार मसराम यांनी सांगितले की, “आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य हा अत्यंत संवेदनशील विषय आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही.विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.”तसेच,वसतिगृहातील सर्व सुविधा तातडीने पूर्ववत करून विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवेश व निवास उपलब्ध करून द्यावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल,असाही इशारा त्यांनी दिला.या पाहणीमुळे आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेविरुद्ध स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रसंगी आरमोरी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार,सागर वाढई,नगरसेवक तथा गटनेता माणिक भोयर,नगरसेवक अक्षय बागडे,मनोज सपाटे,अनिल किरमे,अशोक भेंडारकर,निशांत वनमाळी आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!