Thursday, October 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ ॲप सुरू केले आहे.या ॲपद्वारे,लोक थेट अन्न सुरक्षा विभागाकडे दूषित किंवा भेसळयुक्त अन्नाची तक्रार करू शकतात.बऱ्याच ठिकाणी खुले खाद्य तेल विक्री करण्यात येते.खुल्या तेलात पामतेल,खनिज तेल किंवा इतर स्वस्त व आरोग्यास अपायकारक पदार्थाची भेसळ होण्याची शक्यता अधिक असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी आहे.अन्न सुरक्षा नियमांनुसार खाद्यतेलाच्या पॅकिंगवर ब्रँडचे नाव,उत्पादकाचा पत्ता,बेंच क्रमांक, पॅकिंगची तारीख,एफएसएसएआय परवाना क्रमांक आणि वजन नमूद करणे बंधनकारक आहे.तसेच,तेलाची विक्री केवळ शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणित आकारांमध्येच करता येते.ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पॅकबंद व प्रमाणित खाद्यपदार्थांचा वापर करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले.विशेष म्हणजे, ग्राहक रेस्टॉरंट,हॉटेल आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांमधील निकृष्ट दर्जाच्या किंवा भेसळयुक्त अन्नाची माहिती फोटोंसह अपलोड करू शकतात.एफएसएसएआयच्या मते,देशातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही भेसळीशिवाय स्वच्छ,ताजे अन्न मिळावे,हे सुनिश्चित करण्यासाठी ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ ॲप सुरू करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!