Wednesday, October 14, 2026
Homeआरमोरीआजची दुःखद घटना..! २६ वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू..

आजची दुःखद घटना..! २६ वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-नदी घाटावर आंघोळीसाठी गेलेल्या एका २६ वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज,मंगळवार ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरमोरी- गांगलवाडी टी-पॉईंट जवळील वैनगंगा नदी घाटावर घडली.शुभम रामटेके वय २६ वर्षे,रा.गायकवाड चौक,आरमोरी, जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
आज सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला.सकाळच्या सुमारास लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनी रंग खेळून आनंद द्विगुणित केला. अश्याच प्रकारे शुभम रामटेके हा  रंगपंचमी साजरी केल्यानंतर काही मित्रांसोबत आरमोरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या गांगलवाडी टी-पॉईंट जवळील वैनगंगा नदी घाटावर आंघोळीसाठी गेला होता.आंघोळ करत असतांनाच शुभम हा खोल पाण्यात गेला.पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.लागलीच मित्रांनी आरडाओरड केली.पण,तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि शुभमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.ऐन उत्सवाच्या दिवशीच दुःखद घटना घडल्याने रामटेके कुटुंबियांवर मोठा आघात होऊन शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोऱ्यात तालुकास्तरीय युवा अडोस-पडोस संसद संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत,गडचिरोली आणि पांडुरंग बनपूरकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धानोरा येथे तालुकास्तरीय युवा...

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!