Wednesday, October 14, 2026
Homeगडचिरोलीधानोऱ्यात तालुकास्तरीय युवा अडोस-पडोस संसद संपन्न..

धानोऱ्यात तालुकास्तरीय युवा अडोस-पडोस संसद संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत,गडचिरोली आणि पांडुरंग बनपूरकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धानोरा येथे तालुकास्तरीय युवा अडोस-पडोस संसद पार पडली. ‘नशामुक्त युवक, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात युवक-युवतींना व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थितांनी आजीवन निर्व्यसनी राहण्याची शपथ घेतली.
न्यू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.हिराजी बनपूरकर, मुक्तिपथचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कुडमाटे,निर्माण गडचिरोलीचे प्रकल्प सहाय्यक विक्रांत कुथे आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्राची बनपूरकर यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व सांगितले. सुदृढ आणि ध्येयवादी तरुण पिढी राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची असून,विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे,असे आवाहन मार्गदर्शकांनी केले.
माय भारत,गडचिरोलीचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी दृक्‌श्राव्य सादरीकरणातून व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांची माहिती दिली. कार्यक्रमात धानोरा तालुक्यातील युवक-युवती सहभागी झाले होते.यावेळी संजय बनपूरकर, पुष्पराज उंदिरवडे,लोमेश हरडे,अनिल बनपूरकर आणि रवींद्र वानखेडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भूषण लोळे यांनी केले,तर प्रा.आकाश बर्लावर यांनी आभार मानले.आयोजनासाठी नितीन बावनकर,उत्सव मडावी,संतोष गोपावर आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!