Friday, September 11, 2026
Homeआरमोरीपठ्ठ्याने १८ वर्षे पूर्ण व्हायला एकच महिना असतांना फूस लावून पळवून नेले.....

पठ्ठ्याने १८ वर्षे पूर्ण व्हायला एकच महिना असतांना फूस लावून पळवून नेले.. – संशयित युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल; आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-अल्पवयीन मुलींच्या प्रेम प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. अनेकजण पाहणी-देखणीचे विवाह करण्यापेक्षा लव्ह मॅरेजकडे वळलेले दिसून येत आहेत.त्यातच सर्वसामान्य नागरिकांची प्रकरणे लवकर जग जाहीर होत असतात.तर मोठ्यांची प्रकरणे चार भिंतीच्या आतच म्हणावे लागेल.अशातच आता गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत  अचंभित करणारी घटना उघडकीस आली आहे. आरमोरी तालुका व कुरखेडा तालुक्यातील काही गावे लागूनच असल्यासारखी आहेत.त्यामुळे कुरखेडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून एका संशयितावर अपहरणाचा गुन्हा आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.मंगेश टेकाम असे संशयिताचे नाव आहे.पठ्ठ्याने मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व्हायला एकच महिना असतांना नेल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी म्हणजेच १४ एप्रिल रोजी मुलीचे कुटुंबीय रात्रीच्या सुमारास जेवण करून निद्रावस्थेत गेले.सकाळच्या सुमारास कुटुंबीय जागे झाले असतांना मुलगी घरी नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले.त्यामुळे त्यांनी इतरत्र व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. शोधाशोध करुनही मुलीचा थांगपत्ता लागेनासा झाल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.त्यानुसार मुलगी कुठेच आढळून न आल्याने एका युवकावर शंका बळावली व संशयित मंगेश टेकामविरुध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार १७ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन युवतीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!