Sunday, July 26, 2026
Homeआरमोरीआरमोरी-रवी मार्गावरील जंगल परिसरात आढळला कुजलेला मृतदेह..

आरमोरी-रवी मार्गावरील जंगल परिसरात आढळला कुजलेला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी-रवी बायपास मार्गावरील जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत अज्ञाताचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळाच्या पाहणीवरून आढळून आलेला मृतदेह पुरुषाचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.सदर घटनेची माहिती काही नागरिकांनी आरमोरी पोलिसांना काल,२६ एप्रिल रोजी दिली.त्यानुसार सदरचे प्रकरण उजेडात आले.अशातच घटनास्थळी काही शालेय साहित्य मिळाले असल्याची चर्चा आहे.
माहितीनुसार,आरमोरी शहरापासून देसाईगंजमार्गे काही अंतरावर डम्पिंग यार्ड जवळ मोठा नहर असून उजवेस नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर डावीकडून पश्चिमेस रवी बायपास डांबरीकरण मार्गाच्या ५०० मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर अंतरावर जंगलात दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांनी तेथे जाऊन पाहिले असता अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.त्यानुसार उपस्थित नागरिकांनी आरमोरी पोलिसांना कळविले असता ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास गवते हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. न्यायवैद्यक चाचणीसाठी पथकाच्या मदतीने मृतदेहाच्या हाडाचे नमुने घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली.शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच नेमके मृत्यूचे कारण काय? हत्या की आत्महत्या? हे कळणार आहे.जंगल परिसरात मृतदेह सापडल्याने शंका-कुशंका वाढीस लागलेल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!