- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस
ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. चंद्रशेखर भास्कर दहिकर वय ६२ वर्षे, रा.बोथली,ता.आमगाव,जि.गोंदिया असे हत्या झालेल्या माजी प्राध्यापकाचे नाव असून ते मूळचे अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा तालुक्यातील अचलपूर येथील रहिवासी होते.
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील भवभूती महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक राहिलेले चंद्रशेखर दहिकर यांनी १६ वर्षे नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन बोथली गाव नजीकच्या शेत शिवारात फार्महाऊस बांधून त्या ठिकाणी राहायचे व शेती करून उदरनिर्वाह करायचे. अश्यातच मंगळवार २७ ऑक्टोंबर २०२६ रोजी त्यांचा मृतदेह शेतातील निवासस्थानासमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी त्यांचे डोके ठेचून हत्या केल्याचे समोर आले.हत्येची बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली व घटनेची माहिती गावातील पोलिस पाटलांना दिली.त्यानंतर आमगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळाला गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे,एसडीपीओ नंदिनी चानपूरकर,पोलिस निरीक्षक कुकडे यांनी भेट दिली.हत्येप्रकरणी आमगाव पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

