Wednesday, October 28, 2026
Homeगडचिरोलीपंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुजरातमधील बनासकांठा येथून एका क्लिकद्वारे पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी थेट जमा करण्यात येणार आहे,
भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाते.या योजनेच्या २४ व्या हप्त्याच्या वितरण सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागी होता यावे,यासाठी विविध स्तरांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना निधी वितरण सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाशी जोडले जाणार आहे.
जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र,कृषी उत्पन्न बाजार समिती,विविध शासकीय कार्यालये आणि संशोधन केंद्रांमध्ये या सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्या व संघटना(एफपीसी/एफपीओ)आणि सहकारी पतसंस्था(पॅक्स)येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा,तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर वितरण सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
स्थानिक कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग नोंदविण्याच्या दृष्टीने विविध संस्था आणि स्थानिक स्तरांवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीनेही या वितरण सोहळ्यात सहभागी होता येणार आहे.त्यासाठी “https://pmindiawebcast.nic.in” (https://pmindiawebcast.nic.in)या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण पाहता येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!