Thursday, September 24, 2026
Homeआरमोरीआरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनीश्वर बोरकर,तर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे,जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद अंबादे,सोनु साखरे,टि.एम.खोब्रागडे,महासचिव अशोक शामकुळे,ॲड.सुखदेवे,सामाजिक कार्यकर्ता चक्रधर मेश्राम,सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे, तालुकाध्यक्ष हरिदास सहारे आदींची उपस्थिती लाभली.
बैठकीमध्ये आगामी काळातील पक्षाची भूमिका, संघटनात्मक बांधणी,पक्षाच्या ध्येय-धोरणांची प्रभावी अंमलबजावणी,वंचित व दुर्बल घटकांचे प्रश्न,युवक व महिलांचे प्रश्न तसेच आरमोरी परिसरातील विविध स्थानिक समस्या यावर चर्चा करण्यात आली.तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून व्यापक आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.बैठकीला नाजूक भैसारे,भूषण शामकुळे, तुकाराम खोब्रागडे,एकनाथ बोरकर,मुखरू मेश्राम, रुमाकांत कोल्हेकर,लालजी मेश्राम,देवानंद गेडाम,पुरंदर देशपांडे,युवराज धंदरे, सुरेश बोरकर,बाळू सावकार, मनोहर खोब्रागडे,जिवन रामटेके,दिलीप रामटेके सहीत आरपीआयचे बहुसंख्य कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!