Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे
संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज,बुधवार २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान  काही ठिकाणी हलका ते मध्यम,तर काही भागांत मध्यम ते मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.उद्या,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी नागपूर, यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर शुक्रवार २५ सप्टेंबरला परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, गोंदिया,भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.दरम्यान,काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल होत आहे.त्यामुळे आज २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या काळात अनेक भागांत अचानक उद्भवणाऱ्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची शक्यता आहे.पाऊस कोसळला तर पिकांसाठी दिलासा देणारा ठरण्याची शक्यता आहे.मात्र,अतिवृष्टी,वीज पडणे आणि वादळी वाऱ्याचा धोका लक्षात घेता शेतकरी बांधवांनी पावसादरम्यान शेतात जाणे टाळून खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!