Thursday, September 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या 
आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक वीर भगवान बिरसा मुंडा,धर्मगुरू पहादी पारी कुपार लिंगो, खिल्या मूठवा, गाय व गायकी आदी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना,शंकरपूरचे अध्यक्ष अमृत ठाकरे,उपाध्यक्ष प्रल्हाद वाघाडे,कोषाध्यक्ष धनंजय ठाकरे,सदस्य शंकर ठाकरे,रामेश्वर राऊत,युवराज वाघाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती,परंपरा व सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले.तसेच जल,जंगल आणि जमीन यांचे संरक्षण,आदिवासी समाजाचे पारंपरिक हक्क, संविधानाने दिलेले अधिकार,वनहक्क कायदा,पेसा कायदा तसेच विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण,आरोग्य,रोजगार,सामाजिक एकता आणि युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे मान्यवरांनी सांगितले.आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती,परंपरा व अस्मिता जपत तिचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.कार्यक्रमास महिला,युवक,ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना,शाखा शंकरपूरचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!