Tuesday, October 20, 2026
Homeदेसाईगंजअंगावर वीज कोसळून अख्खे कुटूंबच ठार ; देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील आजची घटना...

अंगावर वीज कोसळून अख्खे कुटूंबच ठार ; देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना आज २४ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.भारत लक्ष्मण राजगडे वय ३२ वर्षे संगीतकार रा.आमगांव व त्यांची पत्नी अंकिता भारत राजगडे वय ३० वर्षे  दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलांसह गरगळा येथुन लग्न लावून येत असतांना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाडने सुरू झाले.वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी जवळील एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता अचानक वीज अंगावर पडल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच मृत्युमुखी पडले.याबाबत दसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे पाठविले पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये येत्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर पासून ‘एफएफएस’(फार्मर फर्टिलायझर सिस्टीम)ही डिजिटल...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटींमध्ये सुधारणा.. -आता पात्र विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी ३८ ते ४३ हजार रुपये अर्थसहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई...

चारचाकी वाहनातुन दारु तस्करी; देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई.. -९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात दारु बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची अवैध दारू पकडली जाते.मात्र,दारूची तस्करी थांबण्याचे नावच घेत नाही.कारण...

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!