- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ घडली.लोमेश मधुकर राऊत वय २४ वर्षे,रा.कुडेगाव असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोमेश राऊत हा काही कामानिमित्त लाखांदूरला गेला होता.तेथील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने स्वगावी जात असतांनाच लाखांदूर-पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ एका अनियंत्रित भरधाव ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.सदरचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू करून पोलिसांना पाचारण केले.अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाला. दरम्यान,लोमेशला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

