- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य शासनाने विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टल विकसित केले आहे.सध्या या पोर्टलचे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने सर्व सेवा या गेल्या शुक्रवारपासून ते उद्या,मंगळवार २० ऑक्टोंबर २०२६ पर्यंत बंद राहणार आहेत.सदरची तारीख अपेक्षित असून गरज पडल्यास कालावधी वाढू शकतो,असे शासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे,महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागांची संकेतस्थळे,पोर्टल्स,ॲप्लिकेशन्स आणि नागरिक/व्हीएलई सेवांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा अधिक स्थिर करण्यासाठी,डेटा सेंटरचे स्थलांतर आणि प्रणाली अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.या प्रक्रियेदरम्यान, संबंधि त संकेतस्थळे,पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक/व्हीएलई सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.त्यामुळे सदरच्या कालावधीत शासकीय ऑनलाईन कामांसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.त्यातच,पोर्टल बंद असल्याने आपले सरकार केंद्रांमधून दाखल्यांसाठी अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जावरील ऑनलाइन कार्यवाही करणे शक्य होणार नाही.त्यामुळे उत्पन्न,अधिवास यांसारख्या दाखल्यांसाठी या सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या कामांना विलंब होऊ शकतो.दाखल्यांची तातडीने आवश्यकता असलेल्या नागरिकांना सेवा पूर्ववत होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

