Monday, October 19, 2026
Homeकुरखेडाअनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.. -विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमदार रामदास मसराम...

अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.. -विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमदार रामदास मसराम बसस्थानकावर; अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातून शिक्षणासाठी तालुका मुख्यालयी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.विद्यार्थ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी आमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी कुरखेडा बसस्थानकावर विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या जाणून घेत एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने व्यवस्थेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
  • तीन-तीन तास बसची प्रतीक्षा; विद्यार्थ्यांचा संताप👇
ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एसटी बस वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत वेळेत पोहोचता येत नाही.परिणामी,त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना नाइलाजाने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.त्यातच,शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना बसस्थानकावर तब्बल तीन-तीन तास बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. अंधार पडेपर्यंत बस येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा आमदार रामदास मसराम यांच्यासमोर मांडला. विद्यार्थ्यांचा मनस्ताप जाणून घेतल्यानंतर आमदारांनी बसस्थानक प्रमुख गेडाम यांना अनियमित बसफेऱ्यांबाबत जाब विचारला.तसेच गडचिरोली आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विद्यार्थ्यांसमक्ष भ्रमणध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली.
  • समन्वय बैठकीतून बसफेऱ्यांचे नियोजन करण्याचे निर्देश👇
विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी,गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांची समन्वय बैठक घेऊन बसफेऱ्यांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश आमदार मसराम यांनी दिले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार बससेवा उपलब्ध करून देत व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची ताकीदही त्यांनी दिली.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम,माजी सरपंच राम लांजेवार,युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रांजल धाबेकर,सादिक शेख,माजी सरपंच युवराज मरस्कोल्हे आणि लोकमतचे पत्रकार सिराज पठाण उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये येत्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर पासून ‘एफएफएस’(फार्मर फर्टिलायझर सिस्टीम)ही डिजिटल...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटींमध्ये सुधारणा.. -आता पात्र विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी ३८ ते ४३ हजार रुपये अर्थसहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई...

चारचाकी वाहनातुन दारु तस्करी; देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई.. -९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात दारु बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची अवैध दारू पकडली जाते.मात्र,दारूची तस्करी थांबण्याचे नावच घेत नाही.कारण...

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!