Monday, July 20, 2026
Homeकुरखेडादुचाकीची बिबट्याला धडक; पती-पत्नी गंभीर जखमी.. - कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील डोंगरमेंढा फाट्यावरील सायंकाळची...

दुचाकीची बिबट्याला धडक; पती-पत्नी गंभीर जखमी.. – कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील डोंगरमेंढा फाट्यावरील सायंकाळची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-पती-पत्नी दुचाकीने जात असतांना वाटेतच अचानकपणे बिबट्या समोर आला. यात दुचाकीची बिबट्याला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शुक्रवार २५ एप्रिलला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील डोंगरमेंढा फाट्याजवळ घडली.अपघातात कृषी उत्पन्न बाजार समीती,उपबाजार कुरखेडा येथे निरीक्षक असलेले धनंजय हरीभाऊ कुथे वय ५२ वर्षे व पत्नी धनश्री धनंजय कुथे वय ४५ वर्षे रा.ता. श्रीरामनगर,कुरखेडा अशी गंभीर जखमिंची नावे आहेत.
माहितीनुसार,दोघेही पती-पत्नी नातेवाईकाच्या लग्नाकरीता आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास
स्वतःच्या दुचाकीने कुरखेडा-देसाईगंज(वडसा)मार्गे मांढळ ता.लाखांदूर,जि.भंडारा येथे जात असतांना डोंगरमेंढा फाट्याजवळ अचानक त्यांच्या दुचाकी समोर बिबट आला.बिबट समोर येताच दुचाकी बिबट्याला धडकली.धडक बसताच पती-पत्नी रस्त्यावर पडले. यावेळी धनंजय कुथे यांनी हेल्मेट घातला असल्याने डोका बचावला.मात्र,हेलमेट चकानाचुर होऊन हात व पायाला गंभीर जखम झाली आहे.तर पत्नी सुधा गंभीर जखमी झाली.यावेळी लगेच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला कळविण्यात आले. मात्र,रुग्णवाहिका येण्यास उशीर होत असल्याने सदरच्या मार्गाने कुरखेडाकडे कारने जाणारे शिक्षक दाम्पत्य गिरीधर फुलबांधे व सुनिता फुलबांधे तसेच मुलगा तुषार फुलबांधे यांच्या सदरचा अपघात निदर्शनात येताच त्यांनी स्वतःच्या वाहनात दोन्ही जखमींना वाहनात बसवून उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे दाखल केले.याठिकाणी त्यांचावर प्राथमिक उपचार करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक चांगदेव फाये व नगरसेवक सागर निरंकारी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष उल्हास देशमुख यांनी रूग्णालयाला भेट देत जखमींना मदत करीत दिलासा दिला.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही जखमींना पुढील उपचाराकरिता ब्रम्हपुरीच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!