Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमद्यधुंद पोलिसाने एकास चिरडले; गावकऱ्यांचा संताप..

मद्यधुंद पोलिसाने एकास चिरडले; गावकऱ्यांचा संताप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एका मद्यधुंद पोलिसाने अंगणात झोपलेल्या व्यक्तीस चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथे आज,शुक्रवार २५ एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडली.घटनेत रमेश लक्ष्मण सपकाळ यांचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच साखरझोपेत असलेला संपूर्ण गाव जागा झाला व घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला. त्यानुसार पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली.
अधिक माहिती अशी की,आरोपी पोलिसांनी आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून आपल्या घराच्या अंगणात झोपलेल्या रमेश लक्ष्मण सपकाळ यांना चिरडले.यात सपकाळ यांचा जागीच मृत्यू झाला.आज शुक्रवारी पहाटे संपूर्ण गाव साखरझोपेत असतांना ही घटना घडली.या धडकेनंतर संपूर्ण गाव जागे झाले.त्यांनी रमेश सपकाळ यांना सावरण्याचा प्रयत्न केला.पण धडक एवढी जोरात होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.स्थानिकांच्या मते,आरोपी कारचालक पोलिसाने मद्यप्राशन केले होते.घटनेनंतर सर्कलवाडीचे ग्रामस्थांनी वाठार पोलिस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.तिथे त्यांनी निदर्शने करत आरोपी पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.त्यानुसार येथे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.आरोपी पोलिसाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही.पण सदरच्या घटनेबाबत मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!