Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी 'प्रधानमंत्री' शब्द..

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे बदलण्यास मंजुरी दिली असून यापुढे तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द जोडण्यात येणार आहे.यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेस आता ‘प्रधानमंत्री वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना’ तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेस आता ‘प्रधानमंत्री विधवा निवृत्तिवेतन योजना’ व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेस आता ‘प्रधानमंत्री दिव्यांगजन निवृत्तिवेतन योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे.त्याचबरोबर,केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री सामाजिक सहाय्य योजना’ करण्यास मंजुरी दिली आहे.या कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या इतर योजनांच्या नावांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने’चे नाव बदलून ‘प्रधानमंत्री कुटुंब लाभ योजना’ असे करण्यात आले आहे.दरम्यान,ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांसाठीच्या निवृत्तिवेतन योजना तसेच कुटुंब लाभ योजना सध्याच्या स्वरूपातच सुरू राहणार आहेत.तसेच दिव्यांग व्यक्तींसाठीच्या निवृत्तिवेतन योजनेच्या पात्रता निकषांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.दिव्यांगत्वाची निर्धारित मर्यादा ८० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!