Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीसहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचेकडून मार्कंडा देवस्थानातील विकासकामांचा आढावा..

सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचेकडून मार्कंडा देवस्थानातील विकासकामांचा आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी मार्कंडा देवस्थान येथे भेट देऊन मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाला अधिक कामगार नियुक्त करून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
प्रसंगी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यमंत्री जयस्वाल यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिक व भाविकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.मार्कंडा मंदिर हे प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे स्थान असून त्याच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे.हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले.राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी यावेळी मंदिरालगतच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या नऊ कोटी रुपयांच्या विकासकामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत यादव,पुरातत्त्व विभागाचे शुभम कोरे,एमएसआरडीसीचे जाधव,तहसीलदार प्रशांत घोरुडे,गट विकास अधिकारी सागर पाटील तसेच महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!