Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजकुरुड जिल्हा परिषद शाळेतील चित्रपट अजूनही बाकीच.....!- थातुर-मातुर चौकशीचा वाजणार बँडबाजा...

कुरुड जिल्हा परिषद शाळेतील चित्रपट अजूनही बाकीच…..!- थातुर-मातुर चौकशीचा वाजणार बँडबाजा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली): देसाईगंज तालुक्यातील कुरूड जिल्हा  परिषद प्राथमिक(मुले)केंद्र शाळेच्या मोठी दुरुस्ती बांधकामावर बोगस मजूर व इतर जुळवा-जूळव करून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दिनांक-५ डिसेंबर २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुमार आशीर्वाद यांना माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन व चौकशी अधिकारी नेमून शाळेची चौकशी करण्यात आली.चौकशी तर करण्यात आली; मात्र सदर चौकशी थातुर-मातुर केली असल्याने अजूनपर्यंत कुणाला ‘ना हाक ना बोंब’ असे दिसून येत आहे.अशातच थातुर-मातुर केलेल्या चौकशीचा अहवाल मागवून संबंधितांचा बँडबाजा वाजून खरे चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्याने म्हटले आहे.

कुरुड जिल्हा परिषद प्राथमिक(मुले)केंद्र शाळेच्या मोठी दुरुस्ती बांधकामावरील प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून प्रत्यक्ष नजरेसमोर दिसूनही न दिसल्या सारखे करणे म्हणजे ‘घरका मुर्गा दाल बराबर’ असे सदर प्रकारावरून दिसून येत आहे. शाळेमध्ये इयत्ता १ ते ४ वर्गाची मुले शिक्षण घेत आहेत.सदर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही ना कोणत्या सावकाराची,ना शिक्षकांची,ना राजकीय नेत्यांची,ना धनाढ्य-बलाढ्य व्यक्तींची; शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही गोरगरीब व सर्वसामान्य मोल-मजूरी करून उदनिर्वाह करणाऱ्या नागरिकांची आहेत.अशातच सर्वसामान्य नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्यांसाठी येणाऱ्या निधीवरही डल्ला मारला जात असेल तर त्यांच्या सारखे लबाड कुणीच नाही.आजचे विद्यार्थी हे उद्याचे उज्वल भविष्य घडविणारे असे म्हटले जाते.मात्र सदर प्रकरणा वरून काहीजण आपलीच पोळी शेकण्याचे काम करतांना दिसून येत आहेत.विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याचा विचार करून मोडकळीस आलेल्या शाळेची शासनस्तरावरून दखल घेऊन नवीन इमारत वा इमारतीच्या दुरुस्तीस लाखो रुपये दिली जातात. जेणेकरून शाळा ही शाळेसारखी दिसावी व विद्यार्थ्यांना शाळेतील वातावरण ओढवून घेणारे असावे; अशातच शाळेतील इवल्याशा विद्यार्थी वर्गातील बांधकामाच्या इमारतीसाठी येणारा निधीही अनेकांना अपुरा असल्याने अशांची ‘बँडबाजा बारात’ काढल्याशिवाय होणार नसल्याने कुरूड जिल्हा परिषद प्राथमिक(मुले)केंद्र शाळेच्या मोठी दुरुस्ती बांधकामावर झालेल्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून,थातुर-मातुर केलेल्या चौकशीचे अहवाल मागवून पुढील पायरी चढविण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्याने म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!