Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तझाडे तोडण्यासाठी घाई कां केली? इथे आधी जसे होते तसे जंगल करावे...

झाडे तोडण्यासाठी घाई कां केली? इथे आधी जसे होते तसे जंगल करावे लागेल- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वी हैदराबाद विद्यापीठ परिसरातील हजारो,लाखो वृक्षांची कत्तल करण्यात आली होती.निर्दयी सरकारला जंगलातील प्राणी मात्रांची दया आली नसेल काय?त्यामुळे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या.अशातच आता हैदराबाद विद्यापीठ परिसरातील चारशे एकर जंगलातील वृक्षतोडीवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की,इथे आधी जसे होते तसे जंगल करावे लागेल.हा परिसर जंगलासारखा आहे आणि हैदराबादचे फुफ्फुस म्हटले जाते.काही दिवसांपूर्वी औद्योगिक वसाहतीसाठी वृक्ष तोड करण्यात आली होती.याच्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. जंगलातला व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता.यात जंगलात वृक्षतोडीनंतर पशु-पक्ष्यांचे ओरडण्याचे येणारे आवाज आणि इकडे तिकडे धावणारे प्राणी दिसत होते.वृक्ष तोडीवर सर्वोच्च न्यायालयाने विकास प्रकल्प राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सुनावले.विकास प्रकल्प किंवा इतर कोणतेही कारण देत झाडे लावण्यास विरोध केला तर त्या अधिकाऱ्यांना तिथेच जेल बांधून डांबले पाहिजे असे,न्यायालयाने म्हटले आहे. हैदराबादमधील या वृक्षतोडीनंतर पर्यावरणवाद्यांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.झाडे अशी तोडली नाही पाहिजे यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने पुन्हा जशी होती तशी स्थिती निर्माण करावी,असे आदेश दिले आहेत. तेलंगना सरकारला फटकारतांना सुप्रीम कोर्टाने म्हटले की,१०० एकर जमीनीवर आधीसारखी स्थिती करण्यासाठी प्लॅन तयार करा.झाडे तोडण्यासाठी घाई का केली? असा प्रश्नही उपस्थित केला.पर्यावरणाला जी हानी पोहोचवण्यात आलीय त्यामुळे चिंता वाटतेय असेही सर्वोच्च न्यायलयाने म्हटले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!