Saturday, August 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसाध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. - तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण कायदा २००३ मधील कलम ५५ व कलम ४७(५)नुसार ग्राहकांना वीज मीटर निवडीचा अधिकार आहे.त्यामुळे,वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज मिटर बदलताच येत नाही. पण,आता वीज वितरण कंपनी वेगवेगळी कारणे सांगून ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव टाकत आहे. अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसतांना कमी किंवा जास्त बिल येत असल्याचा आरोप करत मीटरच्या तपासणीसाठी पथके पाठवली जात आहेत.ही पथके घरी आल्यानंतर संबंधितांना ॲक्यू चेक यंत्राद्वारे तपासणी करून मीटर ‘स्लो’ किंवा ‘नादुरुस्त’ असल्याचे सांगितले जाते.त्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त आकारणी करून मीटर बदलण्यात येते,असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. त्यातच,ग्रामीण भागात नवीन स्मार्ट मिटर लावण्याची मोहीम सुरू आहे; स्मार्ट मिटर न लावल्यास तुम्हाला दोन ते तीन हजाराचे नवीन डिमांड भरून मिटर घ्यावा लागेल, अशी बतावणी करून स्मार्ट मिटर लावण्यात येत आहेत. याबाबत नागरिकांना माहिती नसल्याने वितरण कंपनी जे सांगेल त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय ग्राहकांकडे कोणताही पर्याय नाही.पण,स्मार्ट मिटर लावण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऐच्छिक आहे.म्हणजेच एखाद्या ग्राहकाने स्मार्ट मिटर लावायचा नाही,म्हटले तर या प्रकरणी कुणावरही जोर जबरदस्ती केली जात नाही.स्मार्ट मीटर विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत.अश्यातच स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.वाढीव वीज वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार,नवीन स्मार्ट  मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये अचानक तीन ते चारपट वाढ झाली आहे.विशेष म्हणजे,घरातील वीज वापर तेवढाच आहे; पण स्मार्ट मिटर लावताच मोठ्या प्रमाणात बिल वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.हा एकप्रकारे लुटीचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे.म्हणजेच “या हाताने द्या अन् त्या हाताने खवाटून न्या” आणि तेही सर्वसामान्य नागरिकांनाच चुना लगावून.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!