- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे.त्यानुसार,पिडीतेने पोलिसांत तक्रार दाखल केली.अजय सदाशिव सलामे वय ३८ वर्षे,रा.छोरिया लेआउट,रामटेक,जि.नागपूर असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अजय सलामे व एका महिलेच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता(बीएनएस) कलम ६९,३५१(२),३(५)अन्वये गुन्हा दाखल केला आहे; मात्र,अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून संपूर्ण आरोपांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.अजय सलामे हा सध्या राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचा अंगरक्षक असून तो यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांचाही अंगरक्षक होता.
अजयने पिडीत महिलेला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध जुळताच पिडीत महिलेशी संपर्क तुटला.मात्र,पिडीत महिलेने बोलणे बंद केल्याने त्याने फोटो व व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली.पीडित महिला ही रामटेक शहरातील रहिवासी आहे.तर प्रकरणातील सहआरोपी महिला ही सुद्धा रामटेक शहरातीलच आहे.सहआरोपी महिलेने पीडितेच्या मुलांचे नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.त्यामुळे,अजय सलामे व महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे,पीडितेला न्याय मिळावा म्हणून अंगरक्षक अजयच्या पत्नीने पीडितेला सोबत घेऊन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतली व त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.त्यानंतर दोघींनी रामटेक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांची भेट घेतली व तक्रार दाखल केली. प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यावले व राजकुमार थोरात यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

