- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर रोजी मतदान,तर मतमोजणी व निकाल २७ ऑक्टोंबर २०२६ रोजी लागणार आहे.अश्यातच ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी आहे; अश्या राजकारणी लोकप्रतिनिधिंच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदारासाठीची शैक्षणिक अर्हताच नसल्याने त्यांना बाहेरूनच निवडणुकीचा व प्रत्यक्ष प्रचाराचा आनंद घेत उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. यात नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रभारी असलेले चंद्रशेखर बावनकुळे,निवडणूक प्रमुख प्रवीण दटके,काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार व नाना पटोले,तर राष्ट्रवादी काँग्रेसचे
धर्मरावबाबा आत्राम यासारख्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.मतदार नसलेल्यांच्या यादीत विभागातील १४ आमदार व २ खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपच्या १० आमदारांचा समावेश आहे.तर प्रत्येकी एक खासदार भाजप व काँग्रेसचा आहे.पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी किमान पदवीधर ही शैक्षणिक अर्हता आहे.मात्र,जे या निवडणुकीसाठी प्रचाराची व व्यु हरचनेची धुरा सांभाळत आहेत तेच नेते व लोकप्रतिनिधी मतदार नाहीत,ही एकप्रकारची शोकांतिकाच म्हणावी लागेल.विशेष म्हणजे,पदवीधर मतदारसंघाच्या नियमानुसार,मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पदवीधर(ग्रॅज्युएट) असणे अनिवार्य असते.पण,नागपूर विभागातील ३२ पैकी १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी म्हणजेच काहींचे दहावी,बारावी वा कॉलेजचे पहिले-दुसरे वर्ष असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
- १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी👇
- नागपूर जिल्हा-कृष्णा खोपडे (७ वी), चरणसिंह ठाकूर(१२ वी),मोहन मते (आयटीआय),प्रवीण दटके(डिप्लोमा प्रथम वर्ष),चंद्रशेखर बावनकुळे(बीएससी प्रथम वर्ष)
- चंद्रपूर जिल्हा-विजय वडेट्टीवार(१० वी), किशोर जोरगेवार(१० वी)
- भंडारा जिल्हा-राजू कारेमोरे(१२ वी),नाना पटोले(बीए द्वितीय वर्ष)
- गोंदिया जिल्हा-विनोद अग्रवाल(१२ वी), संजय पुराम(१२ वी)
- गडचिरोली जिल्हा-धर्मरावबाबा आत्राम(१० वी)
- वर्धा जिल्हा-समीर कुणावार(१२ वी),राजेश बकाने(बीए प्रथम वर्ष)
- खासदार-श्यामकुमार बर्वे(बीए द्वितीय वर्ष), माया इवनाते(५ वी)
- Advertisement -

