उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून निवृत्त होणार असले,तरी त्यांना पोलीस दलातून किंवा त्यांच्या नियमित रखवालकर्त्यांपासून वेगळे केले जाणार नाही,तर ते आयुष्यभर पोलीस दलाचाच भाग राहणार आहेत व त्यांचे आधीचे रखवालदारच त्यांची काळजी घेणार आहेत.विशेष म्हणजे,यापूर्वी १० वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर या श्वानांना इतर व्यक्ती किंवा संस्थांना दत्तक दिले जात होते.मात्र,या अचानक झालेल्या बदलामुळे आणि नवीन वातावरणाशी जुळवून न घेता आल्याने श्वानांना तीव्र मानसिक तणावाचा सामना करावा लागत असे.अनेक श्वानांनी अन्नाचा त्याग केल्याचे,तर काहींचा यामुळे मृत्यू झाल्याचे विदारक वास्तव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निष्ठावंत रक्षकांच्या पुनर्वसनासाठी नव्या धोरणाची घोषणा केली आहे.त्यानुसार,निवृत्त श्वानांचे वैद्यकीय देखभालीपासून ते दैनंदिन आहार आणि राहण्याच्या संपूर्ण व्यवस्थेची आर्थिक जबाबदारी राज्य शासनाचा गृह विभाग उचलणार आहे.त्यामुळे श्वानांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल आणि त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीविना सर्व सुविधा पुरवल्या जातील. यामुळे यापुढे पोलीस दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या आयुष्याचा शेवटचा काळ अत्यंत सुखाचा जाण्यास मदत होणार आहे.
आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

