Saturday, August 22, 2026
Homeनागपूरघरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.शेख शोयब अकबर शेख वय २६ वर्षे,रा. आरटीओ कार्यालयाजवळ, कळमना,नागपूर व मुजैब जावेद अख्तर शेख वय २२ वर्षे,रा.विटाभट्टी चौक,नागपूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघेही वाहन चालक आहेत.पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत प्रत्येकी ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची दोन वाहने, ४३ हजार १७० रुपये किंमतीचे १०.४८ क्विंटल धान्य आणि ५५२ रुपये रोख असा एकूण ७ लाख ४३ हजार ७२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.जप्त केलेल्या धान्यामध्ये १४ हजार ७०० रुपये किंमतीचा ४.९० क्विंटल गहू,२२ हजार ४७० रुपये किंमतीचे ५.३५ क्विंटल तांदूळ आणि २३ किलो मक्याचा समावेश आहे.शिवाय,शंभर किलो वजन क्षमतेचे दोन वजन काटेही जप्त करण्यात आले.
नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी
येथील वॉर्ड क्रमांक-५ मध्ये २० ऑगस्ट २०२६ रोजी दोघेही अनुक्रमे एमएच ४९ सीएफ ११७६ आणि एमएच ४९ बीएम-९५१० क्रमांकाच्या छोट्या तीनचाकी मालवाहू वाहनाने नागरिकांच्या घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करण्यासाठी फिरत होते.तसेच नागरिकांकडून कमी दरात रेशनचे धान्य खरेदी करून संबंधित व्यक्तींना पैसेही देत होते.काही स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची माहिती कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत गोंडखैरी गाव गाठून पाहणी केली.अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहताच दोन्ही वाहन चालकांनी वाहनांचा वेग वाढवून पळ काढला.मात्र, पोलिसांनी पाठलाग करीत दोन्ही वाहने अडविली आणि चालकांसह वाहने व त्यातील धान्य ताब्यात घेतले व दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई कळमेश्वर तहसील कार्यालयाचे तहसीलदार विकास बिक्कड यांच्या मार्गदर्शनात पुरवठा शाखेचे अधिकारी मंगेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांसह कळमेश्वर पोलीस पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.रामदासजी मसराम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐 🎉शुभेच्छुक -आमदार रामदास मसराम मित्र परिवार

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.रामदासजी मसराम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐 🎉शुभेच्छुक - आमदार रामदास मसराम मित्र परिवार

भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पोलीस हवालदाराने दम देत परिसरात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर ३५...

पूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात  जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज शुक्रवारी वाटप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!