Thursday, August 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रामसेवकांचा राज्यातील सर्व नियोजित ग्रामसभांवर बहिष्काराचा निर्णय.. - ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाचा झाला होता...

ग्रामसेवकांचा राज्यातील सर्व नियोजित ग्रामसभांवर बहिष्काराचा निर्णय.. – ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाचा झाला होता मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे  ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)पी.एन.पाटील वय ५४ वर्षे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने राज्यातील सर्व ग्रामसभांवर बहिष्काराचा मोठा निर्णय घेतला आहे.
शेवरे दिगर येथे १५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभेला सरपंच,पोलिस पाटील,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामसभेत विविध मुद्द्यांवर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले.त्यावर चर्चा सुरू असतांना काही मुद्द्यांवरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.त्यामुळे ग्रामसभेचे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. वादानंतर ग्रामसेवक पी.एन.पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले.त्यामुळे ते ग्रामसभेतून घरी निघाले.ते निघत असतांना तेथिल काही तरुणांनी त्यांना शिवीगाळ केला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी  रुग्णालयात नेत असतांना त्यांना वाटेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.या प्रकारामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमधील नियोजित आणि चालू ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांना निवेदने देऊन ग्रामसेवकांना व कर्मचाऱ्यांना काम करतांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.घटनेच्या पार्श्वभूमीव राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई.१३६ यांनी घेतला आहे.
 युनियनने यापुढे कोणत्याही ग्रामसभेचे नियोजन अथवा आयोजन करू नये,अशी भूमिका घेतली आहे.
ज्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित करण्यासाठी नोटीस अथवा शेड्यूल जारी केले आहे,त्या ग्रामसभांबाबत संबंधित सरपंचांना तात्काळ सूचना देऊन ग्रामसभा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्याची विनंती करण्यात आली आहे.संबंधित सरपंचांनी ग्रामसभा स्थगित करण्यास नकार दिल्यास ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभा घेण्यास असमर्थ असल्याबाबत लेखी कळवतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आश्रमशाळेतील गैरप्रकार प्रकरणी आरोपी शिपायास पोलिस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत कथित गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून आश्रमशाळेच्या नाइट वॉचमनला कोंढाळी...

आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे.मराठी बोलता येत नसलेल्या चालकांना आज गुरुवारपासून नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू...

धक्कादायक..! आश्रमशाळेच्या शिपायाकडून दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे.चक्क शिपायाकडून(नाइट वॉचमन)दोन विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाची...

देसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच एम.एस.डब्ल्यू.(समाजकार्य पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमाच्या १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांना संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!