Wednesday, October 7, 2026
Homeमुंबईआता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य..

आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे.मराठी बोलता येत नसलेल्या चालकांना आज गुरुवारपासून नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे,प्रवाशांशी सुलभ संवाद साधता यावा व सुरळीत सेवा मिळावी यासाठी परिवहन विभागाने या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.संबंधित चालकांना सुरुवातीला एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठीचे ज्ञान नसल्यास चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास बॅज आणि परमिट रद्द करण्याची कारवाई केली जाईल,असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकविण्यासाठी कोंकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने गेल्या १०५ दिवसांपासून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार ६०० गैरमराठी चालकांनी प्रशिक्षण घेतले आहे.ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पद्मश्री साहित्यिक मधु मंगेश कर्णिक,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की,१९८९ पासून व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य आहे.१२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या कायदेशीर व्यवस्थेच्या आधारे आता या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्देश परिवहन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!