Thursday, October 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.या प्रकारात मध्यमवर्गीय नागरिक, सेवानिवृत्त व्यक्ती,वयोवृद्ध आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत.त्यामुळे,नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.अनधिकृत लोन ॲपच्या माध्यमातून कमी व्याजदरात तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखविले जाते.कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांकडून वैयक्तिक माहिती,बँक खात्याचे तपशील,मोबाईलमधील संपर्क क्रमांक आणि अन्य संवेदनशील माहिती घेतली जाते.त्यानंतर या माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाण्याची शक्यता असते.तसेच ट्रेडिंग ॲप्सच्या माध्यमातून कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून पैसे उकळले जातात.
नागरिकांनी ओटीपी,युपीआय पिन,सीव्हीव्ही,पासवर्ड, एटीएम/डेबीट कार्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.अनोळखी लिंकवर क्लिक करू नये,तसेच संशयास्पद ॲप्सला संपर्क,फोटोज,मॅसेज यांसारख्या माहितीची परवानगी देऊ नये.आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित कंपनीची खात्री करावी.डिजिटल लेंडिंग ॲप किंवा संबंधित कंपनीकडून फसवणूक झाल्यास नागरिकांनी विलंब न करता नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा त्या-त्या जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी.आर्थिक फसवणूक झाल्यास संबंधित बँक किंवा युपीआय सेवा प्रदात्यास तात्काळ माहिती देऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि सायबर यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!