- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही कालावधीपासून सोने-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होतांना दिसून येत आहे. अश्यातच आज,शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळीच सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार ३०० रुपयांची वाढ झाली असून ते १ लाख ६२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे,चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल १० हजार रुपयांची तुफान वाढ झाली आहे.विशेष म्हणजे, काल गुरुवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १ लाख ५८ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होता.तर आज त्यात ४ हजार ३०० रुपयांची वाढ होऊन तो १ लाख ६२ हजार ३०० रुपयांवर आला आहे.गेल्या तीन महिन्यांतील सोन्याचा हा उच्चांकी दर ठरला आहे.सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे.शुद्ध चांदीचा दर २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोग्रॅमवरून वाढून थेट २ लाख ४५ हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे; म्हणजेच चांदीमध्ये थेट १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.गेल्या सात आठवड्यांतील चांदीचा हा सर्वात मोठा उच्चांक आहे.महत्वाचे म्हणजे,सोने-चांदीचे दर हे त्या-त्या शहरातील करांची रचना आणि स्थानिक सराफा बाजाराच्या यादीनुसार थोडे वेगवेगळे राहू शकतात.
- Advertisement -

