Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीतूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ ही राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना आहे.या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असून कृषी उत्पादनवाढीसाठी विविध घटकांचा लाभ मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंतचे बियाणे असल्यास बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर तीन वर्षांपेक्षा अधिक व पाच वर्षांपर्यंतचे बियाणे असल्यास बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ३ हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जून २०२६ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.अर्जासाठी शेतकऱ्यांकडे आधार संलग्न फॉर्मर आयडी असणे आवश्यक आहे.अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टलमार्फत सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य(FCFS) या तत्त्वाचाही अवलंब करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत विक्रेत्यांमार्फत बियाण्यांचे वितरण करण्यात येईल.बियाणे पुरवठादार संस्थेच्या विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष ओळख पडताळूनच लाभ दिला जाणार आहे.तसेच एका शेतकऱ्याला या घटकांतर्गत कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठीच लाभ अनुज्ञेय राहणार आहे. यापूर्वी या घटकांतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील दोन वर्षे या योजनेसाठी पात्रता राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन दर्जेदार तूर बियाण्यांचा वापर करून उत्पादनवाढ साधावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!