Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीआत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी नियुक्तीची प्रक्रिया आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे.वेणूगोपाल यांची जाहिरात,कागदपत्रांची छाननी व मुलाखत प्रक्रियेनंतर तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे केवळ कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी राहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार,एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजासाठी तीन समन्वयक नियुक्त करण्याचा निर्णय ९ जुलै २०२६ रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.त्यानंतर ११ ऑगस्ट २०२६ रोजी समन्वयक पदासाठी सरळ मुलाखतीची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.प्राप्त उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली.
समन्वयक पदासाठी १४ ऑगस्ट २०२६ रोजी मुलाखती घेण्यात आल्या.यासाठी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखत समिती गठित करण्यात आली होती.या समितीत डॉ.सतीश गोगुलवार व डॉ.नरेश मडावी हे सदस्य होते.मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २९ ऑगस्ट रोजी निवड व प्रतीक्षा यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.या प्रक्रियेत वेणूगोपाल यांची तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीच्या स्वरूपाबाबत विद्यापीठाने स्पष्ट केले की,  वेणूगोपाल यांच्याकडे फक्त कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी राहील.ग्रामसभा अथवा प्रशिक्षणामध्ये कोणत्याही विषयाचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!