- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना काल सोमवारच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास चामोर्शी-मूल मार्गालगतच्या वाघोली शिवारात रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,रात्रीच्या सुमारास तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. मृताची ओळख पटवणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. अश्यातच चामोर्शी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आणि आज,मंगळवार ८ सप्टेंबर रोजी मृतक तरुणाची ओळख पटली.बंटी उर्फ नंदकिशोर मोतीलाल मिश्रा वय ३४ वर्षे,रा.तेली मोहल्ला,वॉर्ड क्र.५,श्रीराम मंदिराजवळ,मूल,ता.मूल,जि.चंद्रपूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.दरम्यान,चामोर्शी पोलिसांनी हत्येचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.काही संशयितांची कसून चौकशी केली जात असून या प्रकरणाचा तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

