- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure Mid)डीजे (DJ)चा वापर केल्याप्रकरणी आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी सिंदेवाही पोलिसांनी मोठी कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार,मंडळाने शासन आदेशाचे म्हणजेच निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा कारवाई करून डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक ५७०/२६ कलम २२३, ३(५)भारतीय न्याय संहिता सहकलम ३८ (१),१३६,७० महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी डीजे,इतर साहित्य व वाहने मिळून एकूण १५ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार,पोलीस अंमलदार संजय जुगनाके,नारायण येगेवार,शुभम उराडे,कमलेश फेंडर, सुनिल बहेरकार, नंदकिशोर तुमराम यांनी केली.
- Advertisement -

