Thursday, October 1, 2026
Homeसिंदेवाहीसिंदेवाहीच्या विकासातील योगदानाबद्दल उपविभागीय अभियंता षटगोपमावार यांचा गौरव.. - मित्र परिवार व...

सिंदेवाहीच्या विकासातील योगदानाबद्दल उपविभागीय अभियंता षटगोपमावार यांचा गौरव.. – मित्र परिवार व नागरिक मंचचा स्तुत्य उपक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर सिंदेवाही येथील मित्र परिवार व नागरिक मंचच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता षटगोपमावार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सिंदेवाही तालुक्यातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल षटगोपमावार यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत मित्र परिवार व नागरिक मंचच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी उपस्थित नागरिकांनी सिंदेवाही तालुक्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांमध्ये अधिकारी म्हणून षटगोपमावार यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.विकासकामांना चालना देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारे गौरव केल्याने त्यांना भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर विकासासाठी योगदान देणाऱ्या अधिकाऱ्याचा करण्यात आलेला हा सन्मान परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा आदर्श संदेश सिंदेवाही मित्र परिवार व नागरिक मंचाने दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

महिन्याची सुरुवात गॅस सिलेंडरच्या दरवाढीने..!

उद्रेक न्युज वृत्त :-सरकारी तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.आज,गुरुवार १ ऑक्टोंबरच्या सकाळीच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!