- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या ‘महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प ‘महा-स्ट्राइड’ अंतर्गत गडचिरोली जिल्हा १६ कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीसाठी पात्र ठरला आहे.प्रकल्पाच्या कामगिरी मूल्यांकनात पात्र ठरलेल्या राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत निधी वितरण आदेश जारी केला आहे. महा-स्ट्राइड प्रकल्पातील DLI-१ अंतर्गत सन २०२५-२६ मधील कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले असून, त्याची पडताळणी स्वतंत्र पडताळणी संस्थेमार्फत करण्यात आली.एकत्रित गुणांकन किमान ५० टक्के असणारे १३ जिल्हे प्रोत्साहन निधीसाठी पात्र ठरले आहेत.त्यापैकी ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या गडचिरोलीसह जळगाव, कोल्हापूर,सातारा,वाशिम,चंद्रपूर,धुळे,गोंदिया,सांगली, सोलापूर या १० जिल्ह्यांना प्रत्येकी १६ कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी अनुज्ञेय करण्यात आला आहे.या प्रोत्साहन निधीचे वितरण उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार तीन टप्प्यांत प्रमाणशीर पद्धतीने करण्यात येणार आहे.
- पहिल्या टप्प्यात ३.०४ कोटी रुपये👇
पहिल्या टप्प्यात ऑगस्ट २०२६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी ३ कोटी ४ लाख रुपये वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.त्यानंतर अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध झाल्यावर सप्टेंबर २०२६ मध्ये दुसऱ्या टप्प्यात आणि जानेवारी २०२७ अखेरपर्यंत तिसऱ्या टप्प्यात उर्वरित निधी वितरित करण्याचे नियोजन आहे.
- नाविन्यपूर्ण व परिणामकारक कामांना प्राधान्य-जिल्हाधिकारी👇
प्रोत्साहन निधीतून जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी,स्थानिक गरजांवर आधारित तसेच मोजता येण्याजोगे परिणाम साधणारी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत कामे हाती घेण्यावर भर देण्यात येणार आहे. निधीच्या विनियोगासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारी समिती गठित करून खर्चाचा अंदाज, अपेक्षित निष्पत्ती,प्रमुख परिणाम आणि अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम यांचा समावेश असलेले निधी विनियोग प्रस्ताव तयार करावयाचे आहेत.
- Advertisement -

