Friday, October 2, 2026
Homeचंद्रपूरअज्ञात तरुण आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत..

अज्ञात तरुण आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डन समोरील चुनाभट्टी जवळच्या जंगल परिसरात एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदरची घटना काल शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच दुपाच्या सुमारास उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली. दरम्यान,मृत युवकाचे शव बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहे.अज्ञात तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून तरुणाच्या खिशात रेल्वेचे तिकीट आढळून आले आहे.त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मृतक तरुणाने स्वतः गळफास घेतला वा त्याला कुणी मारून त्या ठिकाणी फासावर लटकवले,हे अद्याप गुलदस्त्यात आहे.मात्र, तरुणाची ओळख पटविणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.महत्वाचे म्हणजे,मृतक तरुणाने एका झाडाला प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेतला होता.त्यामुळे, परिसरात शंका-कुशंका वाढीस लागली आहे.परिसरात तसेच आसपासच्या भागात चौकशी करण्यात आली,मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम लागू करा; अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर बहिष्कार.. -सकल ओबीसी संघटनेचा इशारा; आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत ओबीसी समाज सहभाग नोंदवणार नाही. ड्रॉप-डाऊन मेन्यु व स्वतंत्र काॅलम लागु करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!