- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण
चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा मार्ग म्हणून ऑनलाईन गेमचा पर्याय निवडतात.ऑनलाईन गेम हा मनोरंजन वा खाली वेळातील विरंगुळा म्हणून ठीक आहे; पण काही तरुण झटपट पैसा कमविण्याच्या नादात ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील २६ वर्षीय तरुण ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात इतका अडकला की,शेवटी त्याच्यावर जीव देण्याची पाळी आली.त्यामुळे, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमविण्याच्या चार हात दूरच राहणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरला जीवघेणा👇
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील ठाकूर मोहल्ल्यातील २६ वर्षीय मयूर दिवाकर उके हा तरुण परिसरात मिळेल ते काम करून रोजची रोजी-रोटी कमावून आई-वडिलांना हातभार लावायचा.अश्यातच त्याला काही कालावधीपूर्वी ऑनलाईन गेम खेळण्याची सवय जडली.ऑनलाईन गेम खेळता- खेळता गेमिंगच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे, याची माहिती होताच त्याने त्यात पैसे टाकायला सुरुवात केली.सुरुवातीला मयूरने काही पैसे जिंकले. पण,नंतर गेमिंगमध्ये पैसे गमावत असल्याने तो आर्थिक अडचणीत आला.त्यामुळे तो नेहमी वडिलांकडे पैशांची मागणी करू लागला. दरम्यान,मयूरच्या आईची तब्बेत बरी नसल्याने ती उपचारासाठी गडचिरोली येथे गेली.तिच्यासोबत मयूरचे वडीलही गेले.पैश्याची जुळवाजुळव होत नसल्याने मयूर आर्थिक विवंचनेत सापडला.काय करावे त्यास सुचेनासे झाल्याने अखेर त्याने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच १५ ऑगस्टला घरी कुणीही नसतांना मयूरने घरातील स्वयंपाकघराच्या मध्यभागी असलेल्या सीलिंग फॅनच्या कडीला काळ्या रंगाच्या रेशमी धाग्याची रस्सी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.प्रकरणी तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार नामूर्ते करीत आहेत.ऑनलाईन गेमिंगचा नाद किती घातक ठरू शकतो,हे सदरच्या घटनेवरून दिसून येत आहे.त्यामुळे,ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्याच्या नादात पडू नका.
- Advertisement -

