- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना लाखनी वन विकास महामंडळाच्या किटाडी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-३८९ मध्ये उघडकीस आली. लाखनी तालुक्यातील किटाडी जंगल शिवार व आजूबाजूच्या परिसरात मागील दोन वर्षापासून पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे.वाघ नियमितपणे पाळीव जनावरांना आपले लक्ष्य करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.गिरीधर मारोती उपासे रा.तिरखुरी,ता.लाखनी,जि.भंडारा असे नुकसानग्रस्त पशूपालकाचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे काल रविवारी गिरीधर उपासे यांच्या मालकीची गाय गुरे राखणाऱ्यांच्या कळपात जंगल परिसरात चराईसाठी गेली होती.चराई करीत असतांनाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने एका गायीची शिकार केली.त्यामुळे कळपातील उर्वरित गायी भेदरून पळायला लागल्या.दरम्यान, गुराख्याने सदर घटनेची माहिती गावात दिली असता घटनाक्रम लक्षात आला.घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करून पुढील प्रक्रिया पार पाडली.वाघाने ऐन गर्भार गायीला ठार केल्याने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
- Advertisement -

